नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET ऑनलाईन पुर्व तयारीसाठी मोफत टॅब व रोज 6 जीबी डाटा मोफत

MHT-CET/JEE/NEET

MHT-CET/JEE/NEET: महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच विशेष मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE / NEET / MHT-CET Batch 2026 करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.

⬛️ योजनेच्या लाभासाठी पात्रता

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा 
  • विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा
  • विद्यार्थी नॉन – क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा
  • सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील
  • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
  • विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणा नुसार करण्यात येईल
  • इयत्ता दहावी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्याकरिता 70% यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरिता 60 टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे
  • विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वरील नमूद पत्त्यावरून ठरविले जाईल

९वी, १०वी आणि १२वी पास, विद्यार्थ्यांना मिळणार 1,25,000 रुपये स्कॉलरशिप

⬛️ अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (पुढील व मागील बाजू सहित)
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • वैद्य नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate)
  • 10 वी ची गुणपत्रिका
  • विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट)
  • दिव्यांग असल्यास दाखला
  • अनाथ असल्यास दाखला
  • पासपोर्ट साइज फोटो

⬛️ प्रशिक्षण ठिकाण : नागपुर (महाराष्ट्र) – ऑनलाईन

⬛️ प्रशिक्षणाचे नाव : MHT-CET/JEE/NEET Batch 2026 करिता मोफत ऑनलाईन पुर्व तयारी

⬛️ शैक्षणिक पात्रता :  केवळ इतर मागासवर्गीय, भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच विशेष मागास  प्रवर्गातील उमेद्वारा करिता, नॉन क्रिमिलेअर गटात मोडणारा असावा, सन 2024 मध्ये 10 वी पास झाल्यावर इयत्ता 11 मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा/घेणारी असावा/असावी

⬛️ अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन

⬛️ अंतिम दिनांक : 10 जुलै 2023

Leave a Comment