WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Inwell Boring Scheme 2024: शेतकऱ्यांसाठी इनवेल बोअरिंग अनुदान योजना, APPLY NOW

Inwell Boring Scheme 2024

Inwell Boring Scheme 2024: शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्यंत आवश्यक असते ते पाणी. शेतीसाठी पुरक पाणी असेल तर माळरानावर देखील उत्तम शेती करता येते. शेती करताना भरपुर पाण्याची गरज असते. सिंचनाची सोय केल्याने आपण शेतीतून चांगले उत्पन्न देखील घेऊ शकतो. शेतकऱ्यांना शेतीसाठी सुविधा निर्माण करता याव्यात म्हणून शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत इनवेल बोअरिंगसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.  तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुम्हाला आर्थिक मदत हवी असेल तर तुम्ही पाण्याची सोय करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून इनवेल बोअरिंग अनुदान योजनेसाठी अर्ज करु शकता. म्हणूनच आम्ही  यासंदर्भातील सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. Inwell Boring Scheme 2024

काय आहे इनवेल बोअरिंग अनुदान योजना – Inwell Boring Subsidy Scheme 2024

तार कुंपण योजना सरकारकडून 90% अनुदान

आपल्या शेतात बाराही महिने पाण्याची सोय व्हावी म्हणून शेतकरी  शेतात विहिर खोदतात. परंतु बरेचदा खूप खोल खोदूनही पाणी लागत नाही. असे झाल्यास शेतकऱ्यांचा पैसा वाया जातो. जर विहीरीसाठी खोदकाम केल्यानंतर पाणी लागत नसेल, तर अशावेळी विहिरीमध्ये आडवे बोअर टाकून पाणी मिळवले जाते. असे केल्याने विहिरीस पाणी लागण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांना जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी देखील शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत जुन्या विहिरीमध्ये इनवेल बोअरिंगसाठी अनुदान दिले जाते. Inwell Boring Scheme

अर्ज करण्येयासाठी येथे क्लीक करा

या लिंकवर क्लिक करुन तुम्ही योजनेसंबंधीत शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.  तुम्हाला इनवेल बोअरिंग अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करायचा असल्यास महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा.

इनवेल बोअरिंग अनुदान योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना विहिरीतील इनवेल बोअरिंगसाठी 20,000 रुपये इतके अनुदान देण्यात येते. ही योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यासाठी राबविण्यात येणार आहे. Inwell Boring Scheme 2024

इनवेल बोअरिंग अनुदान योजना लाभार्थी पात्रता

  • लाभार्थी अनुसूचित जात प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार लाभार्थ्यांकडे जातीचा वैध दाखला असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराकडे शेतजमिनीचा सातबारा आणि  8-अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारांची वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाखापर्यंत असावी.
  • उत्पन्न दाखला सादर करणे अनिवार्य असेल.
  • लाभार्थी अर्जदारांना कमीत कमी 0.20 हेक्टर आणि जास्तीत जास्त 6 हेक्टर पर्यंत जमीन असणे बंधनकारक आहे.

इनवेल बोअरिंग योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • ग्रामसभेचा ठराव
  • जमीन असल्याबाबतचा तलाठी यांच्याकडील दाखला
  • विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र – विहीर चतुरसीमा
  • अपंग असल्यास दाखला
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report
  • कृषी अधिकारी यांचा क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
  • जमिनीचा 7/12 व 8-अ उतारा
  • लाभार्थ्याचे बंधनपत्र (100 किंवा 500 च्या बॉण्ड पेपरवर)
  • तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचा उत्पन्न दाखला
  •  ज्या जुन्या विहिरीवर इनवेल बोअरिंग बसवायची आहे त्या जुन्या विहिरीचा फोटो

लाभार्थ्यांनी वरील सर्व पात्रता व आवश्यक ती कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक आहे. योजनेचा वेळीच लाभ घ्यायचा असल्यास वरील कागदपत्रांपैकी सर्व कागदपत्रे अनिवार्य आवश्यक आहेत. Inwell Boring Scheme 2024

इनवेल बोअरिंगसाठी अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

inwell boring online application साठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे.  ऑनलाइन अर्जासाठी 23 रुपये  इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने आकारण्यात येतात. याचे  पेमेंट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा गुगल पे किंवा फोन पे च्या माध्यमातून करू शकता. Inwell Boring Scheme 2024

निळे आधार कार्ड कसे काढायचे

इनवेल बोअरिंगसाठी अनुदान योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार नसल्याने तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर तुम्ही योजनेसाठी पात्र ठरणार नाही. ही बाब देखील अर्जदारांनी लक्षात ठेवली पाहिजे. Inwell Boring Scheme 2024

2 thoughts on “Inwell Boring Scheme 2024: शेतकऱ्यांसाठी इनवेल बोअरिंग अनुदान योजना, APPLY NOW”

Leave a Comment